Header Ad

मी, सोशलमिडीया आणि राजकारण

मी, सोशलमिडीया आणि राजकारण !



२०१२ मध्ये फेसबुक वापरायला सुरवात केली. सुरवातीला वेळही कमी मिळायचा. नेट बँलेन्सही महाग असायचा. आणि तेंव्हा रोज फेसबुक वापरायलाच हव अस काही वाटत नव्हत. अधुनमधुन फेरफटका मारायचो. बर फेसबुकवर करायच काय तर म भारी भारी प्रेमाच्या काँपी पेस्ट शेरो शायरी शेअर करायच्या. जमलच तर एखादा फोटो. 😊 फेसबुकवर शोधाशोध करायची. ओळखीच्या इनबाँक्सला जाऊन जेवण झाल का विचारायच जमलच तर जरा गप्पा मारायच्या. तेंव्हा आण्णा आंदोलन गाजल. भर्ष्टाचारामुळे देशभर काँग्रेस विरोधी वातावरण तयार झाले. 
मी पण काँग्रेसविरोधी झालो. मला अस वाटायच यांना जेलमध्ये पाठवल पाहिजे. आणि २०१४ निवडणुकांचे वारे वाहायला लागले. मी तेंव्हा न्युज चँनेलच्या लिंकवर काँग्रेसविरोधी वादग्रस्त कमेंट करायला लागलो. कधीकधी त्या कमेंटला १५० , २०० लाईक किंवा त्यापेक्षाही जास्त लाईक मिळायच्या. 
त्या लाईकमुळे मला अस वाटायच की मी काहीतरी भारी कमेंट केली. मग फारसा अभ्यास नसतांनाही मी काहीही वाट्टेल ती कमेंट करायला लागलो. वाँलवर पोस्ट करायला लागलो. त्यामुळे एका विशिष्ट वर्गाच्या फ्रेंन्ड रिक्वेस्ट यायला लागल्या.
मग  हळुहळु इतरांच्या जातीधर्मावरही पोस्ट वाचुन मी पण तश्या पोस्ट करायला लागलो. मला काही प्रश्न पडायचे. जसे आपण डाँ.बाबासाहेब आबेंडकर जयंती जोशात साजरा करतो त्याच जोशात गौतम बुद्धांची जयंती का साजरा करत नाही. बाबासाहेब आबेंडकरांनी आरक्षण दिल म्हणुन जोशात करतात?
असे प्रश्न त्याकाळी मी आबेंडकरवाद्यांना विचारायचो. त्यावर माझ्याच मित्रांसोबत वाद घालायचो. शाळा, काँलेजचे मित्र असल्याने ते कधीच दुरावले नाही. उलट ते मला सांगायचे. तुला हळुहळु कळेल. पण जे एका विशिष्ट वर्गाचे लोक फेंन्डलिस्टमध्ये आले ते लाईक कमेंट करुन प्रोसाहन द्यायचे. 
या लाईक कमेंटने लोकांच खुप वाईट केले. तेंव्हा मी पुण्याला कंपनीत कामाला होतो. मुबंई जशी पाण्याने(समुद्राने वेढलेली आहे तसेच पुणे शहर औद्योगिक करणामुळे वेढलेले आहे. हिजंवडी, हडपसर, भोसरी, चिंचवड, वाघोली, शिक्रापुर, राजंणगाव, बारामती इ. चारही बाजुने कंपन्याच कंपन्या 
हजारो लोकांना इथे रोजगार मिळाला. देशभरातील लोक पुण्यात येऊन पोटापाण्याची सोय करतात. २०१४ निवडणुक आली होती. भाजपाचे अनेक लोक तेंव्हा काँग्रेस राष्ट्रवादीवर आरोप करायचे. बैलगाडीभरुन कोर्टात पुरावे देणार, जेलमध्ये टाकणार ते ऐकुन ऐकुन माझ मत अस झाल की, 
पवार साहेबांनी पुणे जिल्ह्याचा व परीसराचा खरच शक्य तितका विकास केलाय. पण महाराष्ट्राचा पैसा यांनी खाल्ला. मला आपला गाव, उत्तर महाराष्ट्र भकास आहे तिकडे एमआयडीसी का नाही अस तेंव्हा वाटायच. सरकार औद्योगिक वसाहत स्थापन करतांना काय गोष्टी आवश्वक असतात उदा. पाणी, वाहतुक. 
उद्योजक कंपनी जागा निवडतांना काय काय विचार करतात याचा तेंव्हा अभ्यास नव्हता. म्हणुन कमेंटमधुन थोडासा राग व्यक्त केला होता. कमेंट खरच आक्षेपार्य होती. पण निवडणुकीची धुंदी होती म्हणुन ती कमेंट केली होती. त्या कमेंटमुळे मला पवार साहेबांच्या कार्यकर्त्याचा काँल आला होता.
सुरवात थोडीशी रागातच तु पुण्यात कुठे असतोस… वगैरे… पण कार्यकर्ता तितकाच समजंस होता. त्यामुळे नंतर तासभर छान चर्चा झाली. माझ मत बदलल नाही पण तेंव्हापासुन मी पोस्ट, कमेंट करतांना विचार करु लागलो. २०१४ निवडणुक संपली. नविन सरकार आले. टिव्हीवर गाजावाजा सुरु झाला. 
पण माझ्या राजकीय पोस्ट हळुहळु कमी झाल्या. चांगल्या लोकांसोबत जोडल्या गेलो. पण २०१६ पर्यंत मी आत्ताच्या सत्ताधारी पक्षाला कुठेतरी अंधसमर्थन करतच होतो. कदाचित मिडीया मार्केटींगचा माझ्यावरही परिणाम झाला होता. नंतर शेतकरी मोर्चे आले, मराठा आरक्षण असे काही प्रकरण गाजले. 
तेंव्हा काही उच्चवर्गीय लोकांचे शेतकरीबाबतचे, बहुजन समाजाबाबचे विचार ऐकुन धक्काच बसत गेला. फुकट पाहिजे साल्यांना, दारु पिऊन कर्ज करतात, लग्नात पैसे उडवतात, शेतीला व्यवसाय म्हणुन बघायला हव अशा अनेक मुर्ख पोस्ट या वर्गाकडुन वाचण्यात यायला लागल्या. अजुन बरच काही घडत होत. 
आणि मी भुतकाळात खुप मोठी चुक करत होतो म्हणुन गिल्टी फिल व्हायला लागल. यानंतर २०१६ पासुन या सगळ्या कट्टर लोकांना यादीतुन वगळ्याच काम केल. मित्रयादी लिमिटेड केली. सोशलमिडीयामुळे बातम्यांची सत्यता जाणुन घेण्याचा प्रयत्न करु लागलो. 
आणि २०१९ पर्यंत तर मी राजकारणाच्या बाबतीत पुर्ण बदललो. आता विरोध करतांनाही कोणी दुखावणार नाही याची काळजी नक्कीच घेतो. चांगल्या लोकांसोबत जोडला जात असतांना त्यातुनच चांगले वाटणारे काही अंधसमर्थन होते यादीत आले होते. हे कळाल तेंव्हा मी त्यांना स्वताहुन काढले.
कारण समर्थन आणि अंधसमर्थन यातला फरक मला बऱ्यापैकी कळायला लागलाय. एकाला काल परवाच मित्रयादीतुन काढले म्हणुन त्याने माझी पब्लिक पोस्टमध्ये बदनामी केली. मी जर त्यावर पोस्ट लिहली तर ती व्यक्ती पिसाळलेल्यागत करेन म्हणुन फार किमंत दिली नाही.
आता सत्ता कोणाचीही आयुष्यात फारसा बदल होणार नाही. मी कदाचित लवकर बदललो. माझ्यासारखी लाखो लोक बदलली. इतर लोकही बदलतील पण त्यांना वेळ लागेल.
आता एक गोष्ट नक्की मरेपर्यंत भाजपाला कधीच समर्थन करणार नाही.

टीप: शाँर्टकटमध्येच लिहलय वाचल्याबद्दल धन्यवाद. 😊

No comments:

Powered by Blogger.