काय आहे करोनाचा रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन; तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये
रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये लॉकडाउनला विभागण्यात येत आहे.
(संग्रहित छायाचित्र)
देशात करोना व्हायरस या महामारीचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. महामारीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन घेण्यात आला आहे. महाराष्ट्रासह पाच राज्यात लॉकडाउन वाढला असून देशातही लॉकडाउन वाढवण्याचे संकेत मिळाले आहेत. यामध्येच सरकारकडून लॉकडाउन हटवण्यासाठी आणि करोनावर मात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारकडून देशाला तीन झोनमध्ये (रेड, ऑरेंज, ग्रीन) विभागण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी राज्यांची मदत घेतली आहे. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडून अहवाल मागवले आहेत.
रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन झोनमध्ये लॉकडाउनला विभागण्यात येत आहे. पंतप्रधानांची देशातील अन्य मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत या तीन झोनवर शिक्कामोर्तब झाले आहे. करोनाचा एकही रूग्ण नाही त्या देशांतील ४०० जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषीत करण्यात येणार आहे. १५ पेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या जिल्ह्यांचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला आहे. देशातील ७५ जिल्ह्यांना रेड झोन म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. त्यापेक्षा कमी रुग्ण संख्या असलेल्या जिल्ह्यांना ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, रेड झोनमधील निर्बंध कठोर केले जाण्याची शक्यता आहे. तर ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. तिथले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येईल. ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांना सर्वाधिक दिलासा मिळणार आहे. अशा जिल्ह्यातील निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जाणार आहेत. जिल्हाबंदी केली जाणार असून शेती, मजुरी, लघु आणि सूक्ष्म उद्योग आणि दारूचे दुकाणं सुरू होण्याची शक्याता आहे. ऑरेंज झोनमध्ये सोशल डिस्टिसिंगद्वारे नागरिकांना व्यवहार करता येणार आहे. तर रेड झोनमध्ये पुर्णपणे लॉकडाउन राहणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. अहवाल आज येणं अपेक्षित आहे.
No comments: