दोन राज्यात सोमवारपासून मद्य विक्री होणार सुरू; सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत दुकानं राहणार खुली
मद्य विक्री बंद असल्यानं घडल्या आत्महत्येच्या घटना
X
संग्रहित छायाचित्र
करोनामुळे देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. या २१ दिवसांच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंच्या विक्री व्यतिरिक्त सर्व काही बंद ठेवण्यात आलं होतं. या काळात दारु मिळत नसल्यानं आत्महत्यांपासून ते दारुच्या चोरीपर्यंतच्या अनेक घटना घडल्या. अखेर २१ दिवसांचा लॉकडाउन संपण्याआधी देशातील दोन राज्यांनी मद्यविक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यातील सरकारनं सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. १७ एप्रिलपासून हा निर्णय लागू असणार आहे.
लॉकडाउनची घोषणा करण्यात आल्यानंतर देशात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व राज्यांनी लॉकडाउनची कडक अमलबजावणी केल्यानं या काळात मद्यपींची दारुसाठी चांगली दैना झाली. केरळमध्ये तर मद्यपी आत्महत्या करत असल्याच्याही घटना समोर आल्या. त्यानंतर केरळ सरकारनं व्यसन जडलेल्या मद्यपींना डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन असेल तर दारु देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, देशभरात दारू विक्री बंदच होती. विशेष म्हणजे या काळात अवैध मार्गानं होणारी दारू विकणाऱ्यांवरही धाडी टाकण्यात आल्या.
दरम्यान, लॉकडाउन संपण्यास दोन दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच मेघालय आणि आसाम सरकारनं सोमवारपासून (१७ एप्रिल) दारु विक्री सुरू करण्याचा निर्णय रविवारी (१२ एप्रिल) घेतला. यासंदर्भात आसामचे उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. के. मेधी यांनी याविषयीचा शासन आदेश जारी केला. तर दुसरीकडं मेघालय सरकारनंही असे आदेश जारी केले आहेत. आसाममध्ये १० ते ५ या वेळेत दुकान सुरू राहणार आहेत. तर मेघालयमध्ये ९ ते ४ या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मद्यविक्री करताना दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टसिंगची काटेकोरपणे अमलबजावणी करण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत
No comments: